#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#रेणूरसोई
#शिंगाडा #थालीपिठ
शिंगाड्याचे थालीपीठ
शिंगाडे हे तलावात होणारे फळ...फार पौष्टिक व चवदार लागतात...
साधारण आॅगस्ट महिन्या पासून मिळायला सुरुवात होते ते डिसेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत ताजे शिंगाडे मिळतात....फार टोकदार काटे दोन्ही बाजूला असतात...
विदर्भात छोट्या आवळ्याच्या आकाराचे मिळतात...कच्चे शिंगाडे हिरवे.. तपकिरी रंगाचे असतात. कच्चे फार कमी प्रमाणात मिळतात.
मीठाच्या पाण्यात उकडलेले काळ्या रंगाचे होतात... दोन्ही बाजुचे काटे अडकित्त्याने कापून ताजे शिंगाडे हातगाडीवर किंवा फळवाल्यांकडे मिळतात.
बाजारात एखाद्या आजी किंवा मावशी पण टोपली भर शिंगाडे घेऊन...कापत विकत असतात.
उत्तर भारतात मात्र हे शिंगाडे आॅक्टोबर महिन्या पासून मिळायला सुरुवात होते.... मोठे लिंबाएवढे आकार...पातळ साल... खायला खुप खुसखुशीत व गोड असतात...ते जास्त करून कच्चे खाल्ले जातात.
हे शिंगाडे वाळले की सुपारी सारखे कडक होतात...ते दळून पीठ करून शिरा, वडे, थालीपीठ असे अनेक उपवासाचे पदार्थ केले जातात.
तेंव्हा आज पाहू या शिंगाड्याचे थालीपिठ...
उपास नसताना पण खा, खुप पौष्टिक आहे😋😋....
पचायला सुध्दा हलकं आहे...☺️☺️
साहित्य...
* शिंगाडा पीठ... 1.5 वाटी
*राजगिरा पीठ... 1/4 वाटी,
*जाडसर दाणे कुट... 1/2 वाटी,
*मिरची ...2 चिरून,
*कोथिंबीर चिरून ...1 टेबलस्पून
*लाल तिखट...1 टीस्पून
*मीठ ...1.5 टीस्पून
*जिरे...1/4 टिस्पून
*तूप ... आवश्यकतेनुसार
कृती...
*तुप सोडून बाकी सगळे साहित्य एकत्र करा, गरजेपुरते पाणी वापरून थालीपिठ चे पीठ भिजवा.
*लोखंडी तवा गरम करून तेल लावा. हाताला पाणी लावून थालीपिठ थापून घ्या. मध्ये व बाजूला छिद्र करा, त्यात व बाजूने तुप सोडून झाकण ठेवा.
*२ मिनीटांनी झाकण काढा.
*दोन्ही बाजूनी कुरकुरीत होऊ द्या.
*दह्याच्या वाटी सोबत सर्व्ह करा.

Comments
Post a Comment