#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणुरसोई
#बेसन #वडी #भात
बेसन वडी भात हा अतिशय चवदार चविष्ट प्रकार आहे.
हा भात व सोबत कढी किंवा चिंचेचे खमंग सारं....दुसरे काही नको... सगळे जण जेवुन तृप्त होतात.
गोळा भातासारखाच लागतो...
संपूर्ण संतुलित आहार ... कार्बोहायड्रेटस, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण ...
खुप मस्त व पोटभरीचा 😋😋😋😋
साहित्य ...
वडीसाठी ...
* बेसन किंवा चणाडाळीचे पीठ ... 1 वाटी 200मिली
* तेल ... 4 टेबलस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* लाल तिखट ... 1 टीस्पून
* हळद ... 1/2 टीस्पून
* खसखस ... 2 टीस्पून
* आले वाटून... 1/2 टीस्पून
* लसूण वाटून... 1/2 टीस्पून
* चिरलेली कोथिंबीर ... 1 टेबलस्पून
* पाणी ... 1 वाटी... 200 मि.ली.
कृती...
* बेसन, मीठ आणि पाणी एकत्र गुठळी होऊ न देता छान कालवून घ्या.
*खसखस भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.
*कढईत तेल गरम करून त्यात आलं पेस्ट, लसूण पेस्ट आणि हळद घाला.
* एक मिनिट परता.
*लाल तिखट आणि बेसनाचे मिश्रण घालावे.
छान एकत्र करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा..
* हे मिश्रण सतत ढवळत रहा, त्याचा छान गोळा होईपर्यंत हलवत रहा.
*मग एका तेल लावलेल्या ताटलीत हे मिश्रण पसरवा, वरतुन भाजलेली खसखस आणि कोथिंबीर देखील पसरवा.
*गार झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात वडी कापा.
* आपली वडी तयार आहे.
भात ...
साहित्य ...
* ता़दुळ... 1 वाटी ... २०० मिली
* भात शिजवण्यासाठी पाणी ... 2 वाटी... तांदळाच्या दुप्पट प्रमाणात
कृती...
* स्वच्छ पाण्याने दोनदा तांदूळ धुवा.
* मग दोन वाटी पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून गॅस बंद करावा.
*गार झाल्यावर बाहेर काढून चर्या.
फोडणीसाठी ...
* तेल ... 4 टेबलस्पून
* मोहरी ...1/2 टीस्पून
* हिंग पुड ... 1/4 टीस्पून
* सुक्या लाल मिरच्या ... 4 ...तोडुन घ्या
कृती ...
* लोखंडी कढई किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडल्यावर
हिंग आणि तुकडे लाल मिरची चे तुकडे घाला.
* गॅस बंद करा.
चिंचेचे सार
* चिंच ... लिंबाएवढी
* गुळ ... चिंचेच्या अर्धा
* तेल ... 2 टेबलस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* कढीपत्ता ... 8
* हळद ... 1/4 टीस्पून
* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून
* मोहरीचे बियाणे ... एक चिमूटभर
* चिरलेली कोथिंबीर ... 1 टेबलस्पून
पद्धत ...
* चिंच स्वच्छ करा, सर्व धागे व बिया काढा. एका वाटी पाण्यात 30 मिनिटे भिजवा.
* 30 मिनिटांनी व्यवस्थित कुस्करून कोळ करून घ्या.
* आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला, फोडणी झाल्यावर त्यात हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला.
* काही सेकंद परता. लाल तिखट आणि चिंचेचा कोळ घाला.
* नीट परतून घ्या, त्यात तीन कप पाणी, गूळ आणि मीठ घाला.
* मध्यम आचेवर पाच मिनिटे उकळा.
* पाच मिनिटांनंतर गॅस बंद करा. चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.
सर्व्हिंगसाठी ...
एका बशीत भात वाढा, त्यावर 4 वड्या थोड्या कुस्करून घाला, एक चमचा खमंग फोडणी घाला. मस्त पैकी कालवून चिंचेच्या सारा बरोबर खा. झक्कास लागतो.

Comments
Post a Comment