#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणुरसोई
#खारे #बन
हे बन म्हणजेच पाव खूप चवदार आणि खमंग असे आहेत, यासोबत आपल्याला बाकी कोणत्याही चटणी, लोणचे याची आवश्यकता नाही....😋😋😋
हा पावा चा मसालेदार प्रकार असल्याने याचे नाव खारा बन असे आहे.
चहा किंवा कॉफीचा गरम कप व हे पाव, बस दुसरे काही नको...
जेंव्हा हे बन बेक करत होते तेंव्हा घर भर एक अप्रतिम सुवास दरवळत होता....... ☺️☺️☺️
इंटरनेटवर बर्याच रेसिपी पाहिल्यानंतर मी हेब्बर स किचन रेसिपी वर आधारित हे पाव करून पाहिले...
साहित्य
* मैदा ... 2 कप
* कोमट दूध ....3/4 कप
* साखर .... 1 टीस्पून
* Active ड्राय यीस्ट ... 1 टीस्पून
* मीठ ..3 / 4 टीस्पून
मसाला साठी ...
* बारीक चिरलेला कांदा ... 1/4 कप
* चिली फ्लेक्स ... 1 टीस्पून
* लाल तिखट ... 1/2 टीस्पून
* जिरे ... 1 टीस्पून
* हिरव्या मिरच्या ...3 बारीक चिरून
* कढीपत्ता बारीक चिरून .... 1/2 टीस्पून
* कोथिंबीर बारीक चिरून .... 2 टेबलस्पून
*लोणी...कणिक भिजवण्यासाठी.. 2 टेबलस्पून
* लोणी वरून लावण्यासाठी .... 1 टेबलस्पून
कृती...
*एका भांड्यात 3/4 कप कोमट दूध (गरम दूध नाही) घालावे, त्यात 1 टिस्पून साखर आणि 1 टिस्पून Active Dry यीस्ट घाला.
* व्यवस्थित मिसळा, झाकून ठेवा आणि 5 मिनिटांत यीस्ट सक्रिय होईल.
*पाच मिनिटानंतर आपल्याला पृष्ठभागावर बुडबुडे दिसतील, बुडबुडे आले नसतील तर बुड बुडे येईपर्यंत ठेवून द्या.
*एका मोठ्या परातीत हे दुध घालून त्यात
२ कप मैदा, 3/4 टीस्पून मीठ घाला आणि व्यवस्थित एकत्र करावे.
* त्यात चिरलेला कांदा, जिरे, मिरची पूड, चिली फ्लेक्स, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी.
* व्यवस्थित मिक्स करावे, छान गोळा तयार करावा.
नंतर त्यात हळूहळू दूध घाला, मी 2 टेबलस्पून दूध घातले आहे. 5 मिनिटे मळून घ्यावे. अतिशय चिकट पीठ होईल.
* छान मऊसर पीठ मळून घ्या.
* नंतर 2 टेबलस्पून बटर घाला आणि कणिक
मउ व चिकटपणा जाईपर्यंत मळून घ्या.
* मी 20 मिनिटे कणीक मळली आहे. छान गोळा झाला पाहिजे, हाताला कणीक चिकटली नाही म्हणजे आपण उत्तम मळले आहे.
* त्यानंतर सर्व बाजूंनी खाली फोल्ड करून एक छान गोळा बनवा.
याला टकिंग म्हणतात. असे केल्याने आकार सुंदर येतो.
* हे पीठ उबदार ठिकाणी एक तास झाकून ठेवा.
* 1 तासानंतर, कणिक दुप्पट होते, म्हणजे आपले बन उत्तम जाळीदार होतील.
* पुन्हा हवा काढून टाकण्यासाठी कणिक मळून घ्या.
* पीठाचे 9 समान आकाराचे गोळे करावेत. त्यांना परत छान चारी बाजूंनी वरून खाली फोल्ड करून गोल आकार द्या.
* बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर ठेवा, व त्याला तूप किंवा लोणी लावा.
त्यावर हे गोळे ठेवा आणि 20 मिनीटां साठी ओलसर कापडाने झाकून ठेवा.
20 मिनिटात, ते आकारात दुप्पट होतील.
* ओव्हन 180 डिग्री वर गरम करा.
* गोळ्यांवर हळूवार हाताने दुधाचा ब्रश किंवा हात फिरवा, असे केल्याने सुंदर रंग येतो.
* ट्रे प्रीहेटेड ओव्हनमध्ये ठेवा आणि 180 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटे बेक करावे किंवा बन वरून सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करावे.
* सोनेरी तपकिरी रंग घेण्यासाठी मला 25 मिनिटे लागली.
* चमक येण्यासाठी वरुन बटर लावून घ्या आणि पाच मिनीटे ओलसर कापडाने झाकून ठेवा.
* बेकिंग ट्रे बाहेर काढा आणि त्यांना गार होऊ द्या.
* चहा, किंवा काॅफी सोबत ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी मस्त लागतात.
टिप.... इथे मी कप हा विकत मिळणाऱ्या सेट मधील वापरले आहेत.
तुमच्या घरी नसतील तर एक कप म्हणजे 200 ml च्या दोन वाटी पीठ घ्या. एक लिटर दूध म्हणजे पाच वाट्या असे मोजुन ती वाटी वापरा.
एक टिस्पून म्हणजे 5 ml चा छोटा चमचा...
एक टेबलस्पून...तीन टिस्पून

Comments
Post a Comment