#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Quick Jaggery Roti
With the beginning of new calendar Year from January...every household starts the Preperations for Tilgud i.e. sweet made from Jaggery n Seasame seeds...
In Maharashtra there is a tradition of preparing Tilgul laddo n Tilgul poli..
तिळगुळाचे लाडू आणि तीळ गुळाची पोळी
This is the Quick version of Tilgul Poli...
Let's see the Recipie...
Ingredients...
*Already prepared Phulka....6
*Roasted Seasame seeds... 1 tbsp
*Chopped Jaggery....1/2 Cup
*Homemade Ghee...2 tbsp
Method...
*Melt the Ghee
*Heat Iron Tawa, coat Phulka with melted Ghee n roast on high flame by pressing it with the help of spatula on both the sides till crispy n light Pink in colour.
*Keep it aside.
*In a pan add 3 tsp Ghee, add Jaggery, keep stirring on low flame till jaggery is soft. Switch off the gas.
*Add 1 tsp Milk in the Jaggery mix, stir continuously. Our Jaggery syrup is ready.
*Coat Jaggery syrup on each Roti by spreading with the help of spoon.
Immediately sprinkle roasted Seasame seeds.
*Our crispy 😋 crunchy sweet Roti ready.
*You can carry it in Tiffins too..
Enjoy.
तिळ गुळ पोळी
जानेवारी महिना आला की सगळ्या महाराष्ट्रात तयारी सुरू होऊन जाते ती म्हणजे तिळगुळाचे लाडु व गुळाची पोळी करण्याची...
गुळाची पोळी आमच्या घरी फार आवडते पण ती खूप आवडत असल्यामुळे फक्त संक्रांतीच्या दिवशीच करून खायची, असा आमच्या घरी प्रघात आहे .... म्हणजे अजुन छान लागते... आज मला काही कारणाने गोड पदार्थ करायचा होता व वेळ फारसा नव्हता...
तेव्हा केली तिळगुळ पोळी ...अतिशय कुरकुरीत ....खाल्ल्यावर फार आवडल्या सगळ्यांनाच...
साहित्य...
*तयार फुलके... 6
*भाजलेले तीळ... एक टेबल स्पून
*चिरलेला गूळ... अर्धी वाटी
*साजूक तूप... 2 टेबलस्पून
कृती...
*प्रथम तुप एका वाटीत पातळ करून घ्या. *लोखंडाचा तवा गॅसवर तापायला ठेवा प्रत्येक फुलका दोन्ही बाजूने पातळ तूप लावून हाय गॅसवर सराट्याने दाबून कुरकुरीत व खमंग पोळ्या करून बाजूला ठेवा.
*नंतर एका कढईत तीन टीस्पून तूप घालून गूळ घाला मंद आचेवर सतत हलवत राहा, थोडा मऊ झाला की गॅस बंद करा व त्यात एक टीस्पून दूध घालून सतत ढवळत राहा.
*गुळाचा पाक होऊन जाईल जास्त दूध घालू नका.
*कुरकुरीत केलेल्या पोळीवर गुळाचा पाक पसरवा.
*लगेच वरून भाजलेले तीळ घालून पसरवा.
*मस्त कुरकुरीत खमंग तिळगुळ पोळी तयार.
*डब्यात द्यायला पण छान आहे.
नवीन रेसीपी ..मस्त .करून बघेन.
ReplyDeleteThanks 🙏
Deleteआवडली की नाही ते पण सांगाल
Super duper...mouth watering
ReplyDeleteThanks 🙏
DeleteKhoop zakas zali. Mr aadhi karayche puran poli sarkha gul bharun. He recicpe mast zali.
ReplyDeleteThanks 🙏☺️
DeleteThanks 🙏☺️
DeleteSurekh
ReplyDeleteThank you 🙏🏼
Delete