Skip to main content

Corn Garlic Pulao

  #RenuRasoi #Corn #Garlic #Pulao  Corn Garlic Pulao  This is a very tasty pulao recipe. Easy to prepare and mildly spicy, so everyone in the family right from kids to elders can enjoy this.  You can skip garlic, if you wish. Goes very well with any Raita, Dal or Curry.  Ingredients  *Raw rice... 1 Cup  1 Cup... 150 ml  *Sweet corn kernels... 1 Cup  *Chopped garlic... 1 tbspn  *Oil... 1 tbspn  • Black pepper... 1 tsp  • Salt ... 1 tsp  • Hot water... 3 Cups  Method...  *Wash rice well and keep aside.  * Grind black pepper to a coarse powder.  *Heat oil in a heavy based pan or kadhai.  *Deep fry chopped garlic till golden in colour, remove and keep aside.  *Now in the same oil add washed rice and black pepper powder. Saute till sticky.  *Add sweet corn kernels and salt. Mix properly.  *Add water little less than 3 Cups, mix properly. Approximately 2.5 cups. We can use the remaining water if needed.  • Cook till all the water get absorbed.  • Serve by adding fried garlic and mint leaves.

Tomato Sar/ Kadhi

#RenuRasoi
Tomato Sar/ Kadhi
This Kadhi goes very well with Khichdi or any Rice preparation.
Very tasty and yummy preperation😋😋
You can drink, one Bowl as a Meal between Meal.
Ingredients
*Tomato...6
*Curd...1/2 Cup
*Chickpea flour...1/2 Cup
*Garlic...4 pods
*Grated Ginger...1 TSP
*Green Chillies...2
*Curry leaves...12
*Oil/Ghee...3 tsp
*Cumin seeds...1/2 tsp
*Asafoetida Powder...a pinch
*Salt...1 tsp
*Sugar...2 tsp
Method...
* Chopp the Tomatoes, put it in one Steel Pot. Cover with the lid, steam on the Gas stove for five minutes without adding any Water.
*Let the Tomatoes cool.
* Now  grind from the Mixer steamed Tomatoes, Curd, Chickpea flour, Grated Ginger, Garlic by adding one Cup water.
* Now in another Pan heat Ghee, add Cumin Seeds, after it splutters add Asafoetida Powder, chopped Chillies and Curry leaves.
*Immediately pour the  grinded Tomato mix. Mix properly.
*Let it boil for 4..5 minutes.
*Done... goes very well with any Rice preparation.


#रेणूरसोई
टोमॅटोचे सार
टोमॅटोचे सार हे आमच्याकडे मसालेभात किंवा खिचडी सोबत फार आवडते.
या सारात दाटपणा येण्यासाठी आम्ही कधी बटाटा ,दाण्याचा कूट पण वापरतो .
पण मी आज थोडे वेगळे टोमॅटोचे सार केले आहे.
आपण टोमॅटोची कढी पण म्हणू शकता,
झटपट होते व छान लागते.
बघू या कसे काय करायचे टोमॅटोचे सार..
साहित्य...
*टमाटे... 6
*दही ...अर्धी वाटी
*बेसन... अर्धी वाटी
*लसूण... चार पाकळ्या
*आले कीस... एक चमचा
*तेल किंवा तूप ...3 टीस्पून
*जिरे ...अर्धा टी स्पून
*कढीलिंब... दहा-बारा पाने
*मिरची...1,2
*मीठ... एक टिस्पून
*साखर... दोन टीस्पून
*हिंग पूड... चिमूटभर
कृती...
*टमाटे चिरून पाच मिनिटं वाफवून घ्या, पाणी न घालता झाकण ठेवून शिजवून घ्यायचे.गार होऊ द्या.
* टमाट्याच्या फोडी, दही ,बेसन ,आले कीस व लसूण एकत्र करून  दोन वाटी पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.
*मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
*छोट्या कढईत तूप घालून जिरे व हिंग घाला. *जिरे तडतडल्यावर मिरच्यांचे तुकडे व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्या.
*ही फोडणी सारामध्ये घाला  व चार-पाच मिनिटे उकळून घ्या.
*नुसते पण पिऊ शकता किंवा खिचडी व मसाले भाता सोबत तर अप्रतिम लागते.

Comments

Popular posts from this blog

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Chitranna

#रेणूरसोई #चित्रान्न भात #रावणभात विदर्भात चंद्रपूर जिल्ह्या ला लागुनच आंध्र प्रदेशाची सीमा आहे... त्यामुळे तेलगु जेवण शैली चा प्रभाव येथील आहारामध्ये आहे. घरी काही मोठं कार्य असेल तर जे स्वयंपाक करायला तेलंगणा भागातील स्वयंपाकी  येतात त्यांना "अय्या" असे म्हटले जाते... तर उत्तरेकडील स्वयंपाकी असतील तर "महाराज" किंवा "पंडित जी"... चित्रान्ना भात किंवा रावण भात हा लहान पणापासून खात आलो आहे. अतिशय चवदार लागणारा हा भात गार च खाल्ला जातो व अतिशय अप्रतिम लागतो. हा भात विशेष करून उन्हाळ्यात कैरी घालून करतात... एरवी वर्षभर पण लिंबू रस केला जातो... अन्ना म्हणजे भात... हा भात सकाळी करून संध्याकाळी खाल्ला तर सगळे मसाले मुरल्यामुळे जास्त चविष्ट लागतो. आज पाहु या अतिशय चवदार चविष्ट असा चित्रान्न भात साहित्य... साहित्य ...  * तांदूळ .... 1 वाटी  * शेंगदाणे ... 2  टेबलस्पून स्पू  * काजू ... 5.. ऐच्छिक  * कैरी किसून... 2 टेबलस्पून  * फुटाण्याच्या डाळ्या .... 2 टेबलस्पून  * सुके खोबरे कीस...1/4 वाटी  * उडीद डाळ ... 1 टीस्पून  * पांढरे तीळ...1 टीस्पून