#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#रेणुरसोई
देशी हरभऱ्याचे कढण
साहित्य ..
*एक वाटी काळा हरभरा
*तेल...2 टिस्पून
*मीठ ...अर्धा टीस्पून
*कढीपत्ता... दहा-बारा
*लाल सुक्या मिरच्या ...दोन
*हिंग... चिमूटभर
*हळद... चिमूटभर
*लिंबाचा रस...एक टीस्पून
कृती...
*हरभरा रात्रभर भिजत घालून ठेवा.
*सकाळी तीन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या देऊन शिजवून घ्या.
*गार झाल्यावर हरभरे बाजूला ठेवा,उरलेले दाट काळसर पाणी असेल त्याच्यात अर्धी वाटी साधे पाणी घाला.
*पातेल्यात तेलाची फोडणी करून मोहरी व हिंग घालून खमंग फोडणी करा.
*चिमूटभर हळद, लाल सुक्या मिरच्या, व कढीपत्ता पाने घाला.
*वरील हरभऱ्याचे उकडलेले पाणी घालून छान उकळी येऊ द्या. लिंबाचा रस घाला.
*गरम-गरम कढण प्यायला द्या.
*अगदी 5 स्टार मधील क्लिअर सुप पेक्षाही जास्त चवदार वऔषधी आहे.
MI nehmi karate. Pan mi lasun sudhha takate bharpur, Noveg. Soup peksha chhan lagat.
ReplyDelete